जेलो च्या विषयी


जेलो हा एक संवाद सहायक ऑग्मेंटेटिव एंड अल्टरनेटिव कम्युनिकेशन (एएसी) उपाय आहे. जेलो आइकॉन वापरुन संवाद साधण्यास मदत करते. जे बोलायला शिकत आहेत, किंवा ज्यांना भाषा बोलण्यास आणि शिकण्यास अडचण आहे ते जेलोचा वापरु करु शकतात.

 • जेलोची संकल्पना आणि डिझाइन विशेषतः मुलांसाठी केलेली आहे. ...>>

  जेलोची संकल्पना आणि डिझाइन विशेषतः मुलांसाठी आणि सुरवतीच्या स्तरावरील वापरकर्त्यांकरिता केलेली आहे. मुलांना सक्षम करण्यासाठी ग्राफिक आइकॉन आणि सोपी भाषा विशेषता डिझाइन केली आहे.

 • जेलो सरळ, सुलभ आणि वापरण्यास अतिशय सोपा आहे. ...>>

  जेलोची आइकॉन आकर्षक आहेत आणि अ‍ॅप्लिकेशनचा इंटरफेस शिकण्यास खूप सोपा आहे. या कारणास्तव जेलो आप्लिकेशन सुरवातीच्या स्तरातील वापरकर्त्यांसाठी एक आदर्श उपाय आहे. जेलो सरळ, सुलभ आणि वापरण्यास अतिशय सोपा आहे.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशन संवाद करण्यासाठी इमोशनल लैंगग्विज प्रोटोकॉल (ई एल पी) वापरते. ...>>

  जेलोची भाषा क्षमता वाढविण्यासाठी एका नवीन इमोशनल लैंगग्विज प्रोटोकॉल (ईएलपी) ची संकल्पना केली गेली आहे. ईएलपीच्या अंतर्गत जेलोमध्ये ६ भाववाहक आइकॉन आहेत, जे या इंटरफेसचे मूलभूत भाग आहेत. जेलोच्या मूल भाववाहक आणि मुख्य वर्ग बटणाच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या आवडी-निवडी आणि आवश्यकता इतरांना सांगू शकतात.

 • जेलो मध्ये १२०० ग्राफिक आइकन आणि १०,००० पेक्षा जास्त पूर्व-निर्मित वाक्ये आहेत. ...>>

  जेलो अ‍ॅप्लिकेशनमध्ये १२०० जास्त ग्राफिक आइकन आहेत, जे खास मुलांसाठी डिझाइन केलेले आहेत जेणेकरुन मुले सहजपणे समजू शकतील. याव्यतिरिक्त, जेलो प्लिकेशनमध्ये आपल्या मुलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी १०,००० पेक्षा जास्त पूर्व-निर्मित वाक्ये आहेत. पूर्व-निर्मित वाक्यांची शब्दावली आपल्या मुलाची सवांद करण्याची आवश्यकता पूर्ण करू शकते. जे मुले योग्यरित्या संवाद साधण्यास असमर्थ आहेत, अशी मुले पूर्व-निर्मित वाक्यांच्या मदतीने सवांद साधु शकतात.

 • वापरकर्त्यांकडून सतत मिळणारे अभिप्राय पाहून जेलो अ‍ॅप्लिकेशनचे पुनः डिझाइन केलेले आहे. ...>>

  पालक, भाषण चिकित्सक, शिक्षक आणि मुलांचे सतत अभिप्राय पाहून अ‍ॅप्लिकेशनचा इंटरफेस वापरण्यासाठी सोपा केला आहे आणि इंटरफेस, ग्राफिक आइकन आणि शब्दावली ३ वर्षांच्या कालावधीत पुनरावृत्तीत केले आहे.

 • जेलो कम्युनिकेटर सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात अनुकूलित आहे. ...>>

  जेलो कम्युनिकेटर वापरकर्त्यांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक रचना लक्षात ठेवून डिझाइन केलेले आहे; म्हणून संबंधित भोजन, सण आणि कार्यक्रम वापरकर्त्याने निवडलेल्या भाषेच्या आधारावर लोड केले जातात.

 • जेलो अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ...>>

  जेलो कम्युनिकेटर अ‍ॅप्लिकेशन इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ, फ्रेंच, स्पॅनिश आणि डच (जर्मन) भाषांमध्ये उपलब्ध आहे.

 • जेलो स्विच एक्सेसेबल आहे. ...>>

  जेलो कम्युनिकेटर स्विच एक्सेसिबल आहे आणि ज्या मुलांना शारीरिक अडचणींमुळे जेलो वापरण्यास समस्या येत आहे त्यांच्यासाठी एक्सटर्नल हार्डवेअर स्विचसह जेलो अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध आहे.

 • जेलो अनेक माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. ...>>

  वरील सर्व वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, जेलोची पूर्णपणे स्वयंचलित सिस्टम म्हणून डिझाइन केली गेली आहे. जी वापरकर्त्यांच्या विविध क्षमता आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी संकल्पित आहे.

  • जेलो पुस्तक: फ्लॅश कार्ड, ई-बुक/पीडीएफ बुकलेट
  • जेलो डेस्कटॉप अनुप्रयोग: http://www.jellow.org/web/
  • जेलो मोबाइल / टॅब्लेट: अँड्रॉइड अँप्लिकेशन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे आणि iOS अँप्लिकेशनऍप्पल ऍप स्टोअरवर उपलब्ध आहे
  • जेलो इनपुट साधने: स्विच ऍक्सेस
  • जेलो कस्टमाइज्ड: लवकरच येत आहे!

जेलो अ‍ॅप्लिकेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी-बी), आय.डी.सी डिझाइन स्कूलमध्ये संशोधक आणि डिझाइनर्स यांनी विकसित केले आहे. जेलो अ‍ॅप्लिकेशनची ही आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी अनेक वर्षे संशोधन आणि अनेक पुनरावृत्ती झाल्या आहेत.

जेलो अ‍ॅप्लिकेशनलाक्रिएटिव कॉमन्स एटट्रिब्यूशन-नॉन-कमर्शियल-शेयर-ए-लाइक ४.० लाइसेंस च्या अंतर्गत लाइसेंस प्राप्त आहे.

जेलो प्रायव्हसी पॉलिसी
नवीन काय आहे:

जेलो ३.0.0 ची नवीन स्थिर आवृत्ती    [१३ जुलाई २०२० ला अद्यन्वित केली आहे]

नवीन आवृत्तीमध्ये खालील वैशिष्ट्ये आहेत:
१) वापरकर्ता आता स्वतःचा बोर्ड तयार करू शकतो. आपली स्वतःची कस्टम आइकॉन जोडू शकतो वा विद्यमान लायब्ररीतून बोर्डमध्ये निवडू शकता. बोर्ड तयार करण्यासाठी, वरच्या उजवीकडे असलेल्या गोलाकार "+" चिन्हावर टॅप करा।
२) वापरकर्ते आइकॉनचे इंग्रजी नाव टाइप करून आइकॉन शोधू शकतात; ही सुविधा सर्व जेलोच्या भाषांमध्ये उपलब्ध आहे।
३) आता वापरकर्त्यांना इंटरनेटद्वारे भाषेची आणि आइकॉन अपडेट मिळतील।
४) एंड्राइड १० व नवीन स्वाइप-आधारित नेव्हिगेशनसाठी सपोर्ट दिला गेला आहे।
५) अपडेटनंतर होणाऱ्या अ‍ॅप क्रॅश सोडवले आहे।सामान्य प्रश्न


 • जेलो मध्ये सध्या कोणती वेगळी माध्यमं उपलब्ध आहेत? मी माझ्या मुलासाठी कोणते जेलो माध्यम वापरावे?
  जेला एक संपूर्ण संवाद सहायक उपाय आहे, जो विविध माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. वर नमूद केल्याप्रमाणे जेलो अ‍ॅप्लिकेशन फ्लॅश कार्ड्स, बुकलेट, ई-बुक, डेस्कटॉप व टॅब्लेट / मोबाइल आवृती मध्ये उपलब्ध आहेत. आपल्या मुलाच्या क्षमतेच्या आधारे आपण सर्वात योग्य माध्यम निवडू शकता. उदाहरणार्थ, सुरवतीच्या स्तरातील वापरकर्त्यांसह फ्लॅश कार्डचा उपयोग करून जेलोची आकर्षक आइकॉन आणि संबंधित नावे शिकवू शकता.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशनसाठी सर्वोत्कृष्ट साधने कोणती आहेत?
  जेलो अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड/अ‍ॅपल टॅब्लेट आणि मोबाईलवर कार्य करते आणि विशेषतः टॅब्लेटसाठी अनुकूलित केले आहे.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशनसाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टम अनुकूल आहे?
  जेलो अ‍ॅप्लिकेशन सध्या एंड्रॉयड डिव्हाइस (एंड्रॉयड आवृत्ती ४.० किंवा अधिक) आणि आयओएस प्लॅटफॉर्मसाठी अनुकूल आहे. जेलो अ‍ॅप्लिकेशन विंडोज प्लॅटफॉर्मसाठी देखील उपलब्ध आहे, जेलोची डेस्कटॉप आवृत्ती डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी अनुकूलित आहे.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशन ऑफलाइन कार्य करू शकते का?
  आपण आपल्या डिव्हाइसवर जेलो अ‍ॅप्लिकेशन ऑफलाइन चालवू शकता. अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करताना आणि विद्यमान भाषा अपडेट करण्यासाठी किंवा अ‍ॅप्लिकेशन मध्ये नवीन भाषा जोडण्याकरीता इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

 • मी जेलो अ‍ॅप्लिकेशन कसे वापरावे?
  जे बोलायला शिकत आहेत, किंवा ज्यांना भाषा बोलण्यास आणि शिकण्यास अडचण आहे, त्यांच्यासाठी जेलो संवाद सहायक उपाय आहे. जेलो अ‍ॅप्लिकेशनचा वापर करुन बोलण्यासाठी, प्रथम कोणत्याही मुख्य वर्गांच्या बटणावर क्लिक करा आणि नंतर कोणत्याही एका साइडच्या भाववाहक बटणावर क्लिक करा. अ‍ॅप्लिकेशनच्या वापरा संदर्भात अधिक माहितीसाठी, कृपया अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोप-यावर क्लिक करून "ट्यूटोरियल" पृष्ठास भेट द्या.

 • जेलो कम्युनिकेटर कोण-कोणत्या आवृत्तीत उपलब्ध आहे?
  आम्ही अलीकडेच जेलोची एकात्मिक आवृत्ती प्रकाशित केली आहे. आमच्याकडे Google Store Play वर आधीपासूनच उपलब्ध असलेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय आवृत्त्यांना एकत्रित केले आहे. खाली दिलेली लिंक वापरून सद्य आवृत्तीवर प्रवेश केला जाऊ शकतोःhttps://play.google.com/store/apps/details?id=com.dsource.idc.jellowintl&hl=en या आवृत्तीमध्ये, वापरकर्ते नोंदणी करताना ड्रॉप-डाऊन मेनू वापरुन त्यांची पसंतीची भाषा आणि बोली (उच्चारण) निवडू शकतात.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशन वापरताना शब्दांचे उच्चारण आणि ध्वनी स्पष्ट नाहीत. मी काय करावे?
  जेलो अ‍ॅप्लिकेशन गूगलचे टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन वापरते. गूगल टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन बर्‍याच उपकरणांवर आधीपासून सक्रिय असते, परंतु सर्व सॅमसंग उपकरणांवर, सॅमसंग टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन डीफॉल्ट रुपाने सक्रिय असते.

  २१ पेक्षा जास्त एपीआय स्तर (लॉलीपॉप आणि वरील) असणार्‍या उपकरणांमध्ये, जेलो अ‍ॅप्लिकेशनची नवीन आवृत्ती (१.२ किंवा त्याहून अधिक) डीफॉल्टरुपाने गूगल टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन वापरते, त्यामुळे वापरकर्त्याना अतिरिक्त चरणें करण्याची गरज नाही.
  तथापि, ज्या उपकरणांचा एपीआय स्तर २१ पेक्षा कमी आहे, त्या उपकरणांसाठी ही प्रक्रिया मैनुअल पद्धतीने केली जाणे आवश्यक आहे. यासाठी अ‍ॅप्लिकेशनच्या "भाषा" सेटिंग्समध्ये सूचना दिल्या आहेत. (अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोपऱ्यात क्लिक करून वापरकर्ते "भाषा" सेटिंग्ज वर जाऊ शकतात.)

  खालील चरणांचा वापर करा: या चरणांची आवश्यकता केवळ एपीआय स्तर 21 हुन कमी (किटकॅट, जेलीबिन इत्यादी) असलेल्या जुन्या उपकरणांसाठी आहे.
  1. आपल्या डिव्हाइसच्या "भाषा आणि इनपुट" सेटिंगवर जा.
  2. त्यानंतर "टेक्स्ट-टू-स्पीच ऑप्शन" वरून "गुगल टेक्स्ट-टू-स्पीच इंजिन" सक्रिय करा.
  3. गूगल टेक्स्ट-टू-स्पीच सेटिंग्स क्लिक करा.
  4. गूगल टेक्स्ट-टू-स्पीच इंजिनची "डीफॉल्ट भाषा" आपल्या पसंतीच्या ( उदाहरणार्थ: हिंदी (भारत), इंग्रजी (भारत), इंग्रजी (यूएस) किंवा इंग्रजी (यूके)) भाषेत बदला.
  5. आपल्या पसंतीच्या भाषेचा आवाज डाउनलोड करण्यासाठी (उदा. हिंदी (भारत), इंग्रजी (भारत), इंग्रजी (यूएस) किंवा इंग्रजी (यूके)) "इंस्टॉल वॉयस डेटा" वर करा" क्लिक करा.

  आपल्या डिव्हाइसमध्ये गूगल टेक्स्ट-टू-स्पीच इंजन नसल्यास, खाली दिलेली लिंक परून ते Google Play वरून डाउनलोड करा -
  https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.tts&hl=en

 • जेलो कम्युनिकेटर मध्ये कोणत्या भाषा आणि बोली उपलब्ध आहेत? मी जेलो अ‍ॅप्लिकेशन मध्ये भाषा कशा बदलू?
  सध्या जेलो कम्युनिकेटर अ‍ॅप्लिकेशन इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, तामिळ, फ्रेंच, स्पॅनिश आणि डच (जर्मन) भाषांमध्ये उपलब्ध आहे. वापरकर्ते भारतीय, अमेरिकन आणि ब्रिटिश बोली देखील निवडू शकतात. अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोपऱ्यात क्लिक करून "भाषा" पृष्ठावर जाऊन भाषा बदलू शकतात.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशनच्या मूलभूत शब्दावलीत उपलब्ध नसलेले शब्द / वाक्य कशी बोलू शकतात?
  अ‍ॅप्लिकेशनच्या मध्ये खाली उजव्या कोपऱ्यात एक "कीबोर्ड" बटण आहे. हा "कीबोर्ड" वापरुन, वापरकर्ते वाक्य टाइप करू शकतात आणि त्यांना स्पीकर बटणावर क्लिक करून जेलोद्वारे उच्चारू शकतात.

 • मी जेलो कम्युनिकेटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये माझ्या मुलाचे प्रोफाइल का तयार करावे?
  या अ‍ॅप्लिकेशन मध्ये आपण आपली मूलभूत माहिती (जसे की - आपला पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आणि आपल्या मुलाचा रक्त गट) संचयित करू शकता. आपल्या अनुपस्थितीत आणीबाणीच्या वेळी, वैद्यकीय कर्मचारी ही माहिती वापरुन आपल्याशी संपर्क साधू शकतात. आपण ही मूलभूत माहिती "माझ्याबद्दल" उपश्रेणी बटणावर क्लिक करून आणि प्रत्येक भाववाहक साइड बटणावर क्लिक करुन मिळवू शकता. माझ्याबद्दल" उपश्रेणी बटण मुख्य श्रेणी बटण "मदत" च्या अंतर्गत उपलब्ध आहेत. आपण अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोपऱ्यात असलेल्या "प्रोफाइल" बटणावर क्लिक करुन आपल्या मुलाची माहिती प्रविष्ट करू शकता.

 • जेलो अ‍ॅप्लिकेशन माझ्या मुलाने सर्वात जास्त वापरलेले आइकॉन लक्ष्यात ठेवते का ?
  पजेलो अ‍ॅप्लिकेशन वापरकर्त्याद्वारे सर्वात जास्त वापरल्या जाणारे आइकॉन आठवणीत ठेवते आणि त्यांना स्क्रीनवर मुख्य निवड म्हणून दर्शवितो. आइकॉन रीसेट करण्यासाठी, अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोपऱ्यात क्लिक करून "आइकॉन रीसेट करा" पर्यायावर जा. असे केल्याने सर्व आइकॉन मूळ क्रमाने दिसून येतील जसे ते अ‍ॅप्लिकेशन मध्ये प्रथम प्रदर्शित केले गेले होते.

 • अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आम्ही अ‍ॅप्लिकेशनच्या विकसकांकडे आमचा प्रतिसाद कळवू शकतो?
  असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण आम्हाला अभिप्राय पाठवू शकता. आपण "जेलो परिवारात" सामील होऊ शकता (आम्ही आपल्याला या पोर्टलवर लॉगिन देऊ) आणि आम्हाला नियमित अभिप्राय पाठवू शकता. आपण या सूचना पृष्ठाच्या शेवटी "अभिप्राय" टॅबमध्ये आपल्या सूचना आणि अभिप्राय देखील पाठवू शकता. या व्यतिरिक्त आपण अ‍ॅप मधून आम्हाला आमच्या सूचना आणि टिप्पण्या देखील पाठवू शकता. आपण अ‍ॅप्लिकेशनच्या वरील उजव्या कोपऱ्यात क्लिक करून "अभिप्राय" पोर्टलवर प्रवेश करू शकता. आपण या पोर्टलद्वारे अ‍ॅप्लिकेशनला विविध समस्यांवर चिन्हांकित करू शकता. "संदेश पाठवा" बटणावर क्लिक करून आपण निवडलेल्या ईमेल क्लायंटद्वारे आपला प्रतिसाद जेलो कार्यसंघास पाठवू शकता. यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता असेल.

 • इतर एएसी उपकरणे /अ‍ॅप्लिकेशनच्या तुलनेत जेलोमध्ये काय वेगळेपण (वैशिष्ट्य) आहे?
  जेलोसाठी ६ भाववाहक बटणे एकत्र करून नवीन व्हिज्युअल इमोशनल लँग्वेज प्रोटोकॉल (ईएलपी) संकल्पित केले आहे. जेलोच्या भारतीय आवृत्तीत, अ‍ॅप्लिकेशनची शब्दावली भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक रचना लक्षात घेऊन तयार केली आहे. जेलोच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीसाठी देखील असेच प्रयत्न केले आहेत. जेलोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेलो वापरुन आपण मुलांना अनुक्रमे रोजची कामे जसे की - दात स्वच्छ करणे, शौचालयात जाणे, आंघोळ करणे इत्यादी.. शिकवू शकतो. यासाठी आम्ही अ‍ॅप्लिकेशन मध्ये प्रत्येक कार्यासाठी क्रमश: चित्रे तयार केली आहेत, ज्याच्या मदतीने मुले ही सर्व कामे शिकू शकतात. जेलो अ‍ॅप्लिकेशनच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही एप्लिकेशन मध्ये सध्या अशी क्षमता नाही.


कार्यक्रम

वर्कशॉप

जेलो वर्कशॉप मुलांचे पालक / काळजी घेणारी व्यक्ती, थेरपिस्ट आणि शिक्षकांसाठी आहे. वर्कशॉप मध्ये आम्ही जेलो विषयी संपूर्ण माहिती देऊ आणि आपल्याला काही सूचनाही देऊ, जेणेकरून आपण आपल्या मुलासोबत जेलो वापरण्यास सुरवात करू शकता.

जेलो कम्युनिकेटरवर वर्कशॉप: जेलो वर्कशॉपला उपस्थित रहाण्यासाठी....>>>

प्रदर्शन

जेलो प्रदर्शनाचा हेतू सामान्य लोकांना जेलो अ‍ॅप्लिकेशन बद्दल माहिती देणे आहे. या प्रदर्शनात जेलोशी संबंधित सर्व भिन्न-भिन्न प्रोडक्ट्स दाखवले जातील. या व्यतिरिक्त आम्ही आपल्या डिव्हाइसवर जेलो अ‍ॅप्लिकेशन इनस्टॉल करून देऊ. जेलो प्रदर्शन मुलांचे पालक / काळजी घेणारी व्यक्ती, थेरपिस्ट आणि शिक्षकांसाठी आहे.


जेलो वर्कशॉप प्रेजेंटेशन डाउनलोड करा.....
जेलो पोस्टर्स डाउनलोड करा.....
पुरस्कार

जेलोला पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत:
 • २०१८:
  दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार, २०१८
  - 'दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपयोजित संशोधन किंवा तंत्रज्ञान नावीन्य' या श्रेणीसाठी
  http://disabilityaffairs.gov.in/content/page/national-awards.php
 • २०१८:
  एमबिलियंथ साऊथ एशिया पुरस्कार
  - 'इन्क्लूजन और एम्पॉवरमेंट' या श्रेणीसाठी
  http://mbillionth.in/jellow-communicator/
 • २०१७:
  युनिसेफ इनोव्हेशन फंड (युनिसेफ)
  - ज्यांना भाषा किंवा संवाद साधण्यात अडचण आहे त्यांच्यासाठी नवीन मुक्त स्त्रोत उपाय तयार केले जातील.
  http://unicefstories.org/2017/12/07/unicef-innovation-fund-ninaad-digital-technology/
 • २०१७:
  नीपमॅन फाउंडेशन माइक्रोसॉफ्ट इक्वल अपॉर्च्युनिटी पुरस्कार २०१७
  - इन्नोवेशंस टू ऐड पर्सन्स विथ डिसैबिलिटीज थ्रू टेक्नोलॉजी
  https://www.youtube.com/watch?v=7JTFDk3l4qU
 • २००४:
  मायक्रोसॉफ्ट डिझाईन एक्सपो अवॉर्ड्स २००४
  - 'सर्वात उत्कृष्ट इंटरफेस डिझाइन' साठी
  https://www.microsoft.com/en-us/research/event/microsoft-design-expo/
लोक

जेलो परिवार

जेलो वापरकर्त्यांचे आमच्या वेबस्पेसमध्ये स्वागत आहे. आम्ही हे पोर्टल जेलो वर मुक्त संवाद करण्यासाठी तयार केले आहे. आपण येथे जेलो वापरुन आलेले आपले अनुभव आमच्या सोबत शेयर करू शकता. तसेच, आपल्याकडे अ‍ॅप्लिकेशनच्या सुधारणेशी संबंधित काही प्रश्न, सूचना असल्यास आपण या पोर्टलद्वारे जेलो टीमला पोहोचू शकता.

जेलो टीम चे सदस्य:


 • पप्रोजेक्ट संकल्पना, अन्वेषण आणि पर्यवेक्षण:
  प्राध्यापक रवि पूवैया आणि डॉ. अजंता सेन
 • प्रारंभिक संकल्पना विकास:
  आँचल कुमार, सम्राट सरदेसाई, पीटर जोसेफ, अंतरा हजारिका
 • सॉफ्टवेअर विकास:
  राहुल रुपचंद जिडगे, सुमित अग्रवाल, आस्था जोशी, रूप नारायण साहू, श्रुति गुप्ता, नारायण रेड्डी, योगेश मासये, अयाज आलम, लक्ष्मण कुमार, सौरभ जैन, हर्षित बुधराजा, निखिल अहिरराव, आदित्य भारद्वाज, धैर्य दंड, प्रीतम पेबम
 • यू एक्स\यू आय डिझाइन आणि समग्र समन्वय:
  प्राध्यापक रवि पूवैया, रूप नारायण साहू, विनया तावड़े
 • सॉफ्टवेअर आणि उपयोगिता चाचणी:
  रूप नारायण साहू, राहुल रूपचंद जिडगे, डॉ. सुधा श्रीनिवासन, विनय तावड़े, सचिन सोनवणे
 • समग्र तांत्रिक समन्वय:
  रूप नारायण साहू
 • आइकॉन, विज्युअल डिझाइन आणि आवाज:
  विनया तावड़े, श्वेता गौरीश पठारे, अनीषा मल्होत्रा, सिमोन सेन, निकिता अय्यर, गणेश गज्जेला, सुमेध गरुड़
 • भाषांतरः
  सचिन सोनावणे, डॉ. सुधा श्रीनिवासन, कौस्तुभ राजवाडे, शशांक खोबरागड़े, जीवा कन्नन मुथ्थुकुमार, दीपल शेठिया, डॉ. रूपक मिश्रा
 • संशोधन, शब्दसंग्रह विकास आणि वापरकर्ता अध्ययन:
  डॉ. सुधा श्रीनिवासन, साक्षी पाल, पुष्कर देशपांडे, सिद्धि पटेल
 • वेबसाइट डिझाइन:
  प्राध्यापक रवि पूवैया, रूप नारायण साहू, योगेश मासये, वैभव शाह
 • समर्थन:
  ई-कल्पा प्रोजेक्ट NMEICT च्या अंतर्गत मानव संसाधन विकास मंत्रालय आणि मायक्रोसॉफ्ट डिझाइन एक्सपो २००४ द्वारे प्रायोजित. आम्हाला अलीकडे युनिसेफ (UNICEF) कडून 1 वर्षासाठी अनुदान मिळाले आहे. हे अनुदान वापरुन, ज्या लोकांना भाषा किंवा संवाद साधण्यात अडचण आहे अशा लोकांसाठी आम्ही नवीन मुक्त स्त्रोत उपाय तयार करु.
आमच्याशी संपर्क साधा


पप्रिय प्रेक्षकांनो, जर तुमच्याकडे जेलो विषयी काही प्रश्न, सूचना आणि प्रतिक्रिया असल्यास किंवा तुम्हाला या प्रोजेक्ट विषयी अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या आमच्या ऑफिसच्या पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा किंवा खाली दिलेला फॉर्म भरा आणि आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याशी संपर्क साधू.

आपले अभिप्राय आणि सूचना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

संपर्क करण्यासाठी पत्ताः

को-ऑर्डिनेटर
प्रोजेक्ट जेलो
आयडीसी अभिकल्प विद्यालय
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई (आय आय टी-बी)
पवई
मुंबई - ४०० ०७६
भारत
फोन: ०९१-२२-२५७६७८२०/४८१५/४८२७
ई-मेल आयडी: jellowcommunicator@gmail.com

प्रतिक्रिया:


करिअर / सहयोग:

आपण आम्हाला सहकार्य करू इच्छित असल्यास किंवा आमच्या टीम मध्ये सामील होऊ इच्छित असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकताः

आपला CV / प्रस्ताव (फक्त PDF / docx फाइल्स):


  रद्द करा