जेलो गोपनीयता धोरण

आम्ही कोणती माहिती संकलित करतो: जेव्हा वापरकर्ता अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर प्रथमच जेलो चालू करतो तेव्हा आम्ही वापरकर्त्यास मुलाचे नाव, काळजीवाहकांचा संपर्क क्रमांक आणि काळजीवाहकाचा पत्ता यासह वैयक्तिक माहिती नोंदणी करण्यास सांगतो. उपरोक्त अनिवार्य माहितीसह, वापरकर्ता अ‍ॅप्लिकेशन मध्ये 'सेटिंग' टॅबवर जाऊन कधीही वैयक्तिक माहिती जसे की काळजीवाहूचे नाव, काळजीवाहूचा ईमेल पत्ता आणि मुलाचे रक्त गट प्रोफाइलमध्ये प्रविष्ट करू शकते. वापरकर्ते अ‍ॅप्लिकेशन मधील 'प्रतिक्रिया' टॅबमध्ये ईमेलद्वारे जेलोच्या विविध पैलूंबद्दल अभिप्राय देण्याचा विकल्प देखील निवडू शकतात.

आम्ही संकलित केलेली माहिती कशी वापरतो: जेलो एक ऑफलाइन संवाद साधक आहे ज्या मुलांना बोलण्यास अडचण येत आहे किंवा जे बोलायला शिकत आहेत. त्या मुलांना जेलो सक्षम बनवतो. अशी मुले आपल्या गरजांबद्दल इतरांशी बोलू शकतात. आम्ही कुटूंबांकडून वैयक्तिक माहिती संकलित करतो आणि अ‍ॅप्लिकेशन मध्ये ती संग्रहित करतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत मुले आपली आपत्कालीन संपर्क माहिती इतरांना सांगण्यासाठी अ‍ॅप्लिकेशनची संप्रेषण क्षमता वापरू शकतात, ज्यामुळे या परिस्थितीत त्यांना मदत होते. अ‍ॅप्लिकेशन मध्ये संकलित केलेला डेटा केवळ आपल्या डिव्हाइसवर संग्रहित होईल. आम्ही आपल्या गोपनीयतेस महत्त्व देतो, म्हणून त्याचा वापर आणि तो कोणत्याही सर्व्हर / क्लाउड वर अपलोड केला जाणार नाही. जेलो विषयी वापरकर्त्यांद्वारे एकत्र केलेले अभिप्राय आणि टिप्पण्या अ‍ॅप्लिकेशनचा विकास करणाऱ्या टीम द्वारे भविष्यातील आवृत्त्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी वापरल्या जातील.

माहितीचे सामायिकरण: आम्ही अ‍ॅप्लिकेशन मध्ये एकत्र केलेली कोणतीही माहिती कोणत्याही तृतीय पक्षासोबत शेयर करत नाही.


अधिक माहितीः जर तुमच्याकडे आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल (प्राइवसी पॉलिसी) काही प्रश्न असल्यास, तर कृपया आमच्याशी मुक्तपणे संपर्क साधा:

ई-मेल आयडी: jellowcommunicator@gmail.com
फोन: 091-22- 25767820/4815/4827
पत्ता:
को-ऑर्डिनेटर
प्रोजेक्ट जेलो
आयडीसी अभिकल्प विद्यालय
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई (आय आय टी-बी)
पवई
मुंबई - ४०० ०७६
भारत